Wednesday, October 22, 2014

सामाजिक नेतृत्वाच्या जीवनात सार्थकता असावी


Vivekananda Kendra, Branch Satara had arranged Manthan Programme, 9th September 2014 on Social leadership - "सामाजिक नेतृत्व - सार्थकता".  Ma. Nivediata Tai was the chief speaker and the topic was followed by question-answer session. 
सातारा : 'समाजाला नेतृत्व देणारी व्यक्ती केवळ यशस्वी असून, चालत नाही तर तिला तिच्या जीवनामध्ये सार्थकता असायला हवी,' असे विचार विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी मांडले. विवेकानंद केंद्राच्या सातारा कार्यस्थान तर्फे आयोजित जैन सांस्कृतिक केंद्र सातारा येथील मंथन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

निवेदिता भिडे म्हणाल्या, 'स्वामी विवेकानंद म्हणतात, सत्याला अनुसरूनच समाजाने बदलले पाहिजे. समाजाला अनुसरून अस्तित्वाचे सत्य बदलत नाही. आज आपल्या पूर्ण अस्तित्वाचे सत्य विज्ञानानेही मांडण्यास सुरू केले आहे. हे जे पूर्ण विश्‍व आहे, अस्तित्व आहे, ते दिसायला जरी वेगवेगळे असले तरी आपल्या सर्वांचे जीवन एकमेकांशी परस्पर जोडलेले, परस्परपूरक आणि परस्परावलंबी आहे. आपल्या यशामध्ये सुखामध्ये परिवाराचे सुख समाजाची एकात्मता पाहिजे. त्यातून राष्ट्र सर्मथ व्हायला हवा, पूर्ण मानवतेचं कल्याण पाहिजे आणि सृष्टीचे संरक्षण व्हावे. समाज नेतृत्वाच्या आचारांचे अनुसरण करतो.'

सी. व्ही. दोशी यांनी विवेकानंदांच्या विज्ञान, व्यापार, उद्योग विचारांचे पैलू सांगून विवेकानंद शिलास्मारकच्या स्थापनेमध्ये सातारकरांच्या सहभागाचा उल्लेख केला. 'मंथन' विषयामध्ये उद्योजक युवराज पवार, जे. एस. पाटील, सुनील पाटणे, वसंतराव फडतरे आदींचा सहभाग होता. कार्यक्रमास विलास कवचाळे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष विठ्ठल माने, सुभाष दोशी, रमेश आगाशे, प्रमोद शिंदे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ज्योती हेरकळ यांनी सूत्रसंचालन केले. अनिल गोहाड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

No comments:

Post a Comment