विश्वबंधुत्व दिना निमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नाशिक तर्फे नानाराव ढोबळे सभागृह,शंकराचार्य संकुल येथे श्री.शशिकांत मांडके, पुणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम 9 सप्टैंबर 2012, आयोजित केला होता. विश्वबंधुत्वाची भावना आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पुरातन काळापासुन रुजलेली आहे. चराचरात परमेश्वराचे अस्तित्व आहे. फक्त आपलाच धर्म नाही तर सर्वच धर्म श्रेष्ठ आहेत. फक्त आपलीच उपासना पध्द्ती योग्य अन्य उपासना पद्ध्तींना अस्तित्वात असण्याचा अधिकारच नाही अशा प्रकारचे एकांगी तत्वज्ञान आपण शिकवत नाही. तर सर्वांना बरोबर घेऊन आपण आपली ऐहिक प्रगती करतो.असे विचार माननीय श्री.शशिकांत मांडके यांनी मांडले. चित्तरंजन देव लिखित “दीपस्तंभ नेतृत्वाचा” व डॉ.अशोक मोडक लिखित“स्वामी विवेकानंदांचे विचार आणि सद्यस्थिती” ह्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मा. शशिकांत मांडके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला 75 श्रोते उपस्थित होते. श्री.शशिकांत मांडके यांचा सत्कार नाशिक नगर संचालक श्री श्रीकृष्ण विद्वांस यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निनाद पाठक याने,गीत रामवाडी संस्कार वर्गातील मुलामुलींनी,प्रास्ताविक अभिषेक कासोदे, व्याख्यात्यांचा परिचय दिग्विजय मगर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कु.छायामणि फुकन यांच्या वंदेमातरम ने झाली. धन्यवाद छायामणी नगर संगठक विवेकानंद केंद्र, शाखा नाशिक
No comments:
Post a Comment